
लॅब्राडॉर जातीचा कुत्रा अंगावर पडल्याने चार वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यू प्रकरणी कुत्र्याच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
_ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरातील एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून लॅब्राडॉर जातीचा कुत्रा अंगावर पडल्याने चार वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला होता.या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.ठाणे शहरातील मुंब्रा परिसरात मंगळवारी (६ ऑगस्ट) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेत एका निष्पाप मुलीचा मात्र जीव गेला आहे. दरम्यान, पोलिसांनी गुरूवारी (८ ऑगस्ट) रात्री कुत्र्याच्या मालकाला अटक केली असून, तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.