राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , खासदार अमोल कोल्हे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख क्रेनमधून पडता-पडता बचावले
आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून ( शरदचंद्र पवार ) राज्यभरात ‘शिवस्वराज्य यात्रा’ काढली आहे.या यात्रेची सुरूवात आजपासून ( 9 ऑगस्ट ) शिवनेरी किल्ल्यावरून होईल. त्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून खाली उतरताना मोठी दुर्घटना घडता-घडता टळली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , खासदार अमोल कोल्हे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख क्रेनमधून पडता-पडता बचावले आहेत. यात कोणालाही दुखापत झाली नाही.शिवनेरी किल्ल्यावरून ‘शिवस्वराज्य यात्रे’ची सुरूवात होणार आहे. त्यापूर्वी शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी जयंत पाटील, अमोल कोल्हे ( रोहिणी खडसे आणि मेहबूब शेख क्रेनच्या सहाय्यानं वरती गेले होते.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून क्रेन खाली येत होती. त्यावेळी अचानक क्रेनच्या ट्रॉलीत बिघाड झाल्यानं ती एका बाजूला झुकली. तेव्हा, त्यातून खाली पडता-पडता जयंत पाटील, कोल्हे, खडसे आणि शेख बचावले. यानंतर हळू-हळू क्रेन खाली आणण्यात आली आणि सगळ्यांना सुखरूप खाली उतरविण्यात आलं. यात कोणालाही दुखापत झाली नाही.