
राष्ट्रवादीचे दिग्गज कार्यकर्त्यांचा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश जिल्हा बँकेचे संचालक रामभाऊ गराटे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
रत्नागिरी मध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून आज राज्याचे उद्योग मंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला खिंडार पडला असून राष्ट्रवादी पक्षाचे शेकडो कार्यकर्त्यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. रत्नागिरी मध्ये राजकीय वारे वाहू लागले असून पाली जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रमुख कार्यकर्ते आणि माजी सरपंचानी शिवसेना शिंदे गटात पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्य प्रणालीवर विश्वास ठेवत प्रवेश केला आहे.शिवसेना पक्षाची बांधणी करण्यासाठी जे जे करावे लागेल ते प्रामाणिक पणे करण्याचे काम शिवसेना पक्षाचा नेता म्हणून मी करणार असल्याचा शब्द यावेळी कार्यकत्यांना दिला आहे. अनेक लोक दारावर येऊन थांबले आहेत अनेक बडे नेते शिवसेनेत येण्याच्या मार्गांवर असून लवकरच मोठा राजकीय भूकंप रत्नागिरीत होणार आहे. पाली गटात पालकमंत्री यांच्या माध्यमातून विकासाची गंगा वाहू लागली असून त्यांच्या काम पाहून आज येथील पदाधिकारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहेत. यावेळी रामभाऊ गराटे ,शांताराम मालप ,संभाजी सुवारे ,प्रकाश परपते,प्रभाकर खोचाडे ,गजानन नागले,विजय तांदळे,श्यामराव नागले,बाळकृष्ण शिवगण,विजय नावले ,प्रमोद शिवगण,अप्पा सुवारे ,रविंद्र मावळंकर,अनंत तरळ,सिताराम घडशी,राम गिते ,नामदेव लिंगायत,अजित गराटे ,बाळू घवाळी,वसंत साठल्ये ,दत्तात्रय पंडित ,प्रकाश हतपळे,जर्नादन परपते , राजू हतपळे ,विलास सावंत यावेळी या सगळ्यांनी प्रवेश केला.