रत्नागिरी परिसरात पावणेतीनशे मोकाट गुरे

रत्नागिरी शहरातील मोकाट गुरांचा प्रश्‍न गंभीर बनलेला असतानाच सोमेश्‍वर शांतीपठ रत्नागिरी या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी शहर परिसरात सर्वेक्षण केले. त्यावेळी सुमारे २७५ गायी, बैल, वासे आढळली. नगर परिषदेकडून मात्र त्यासंदर्भात आवश्यक हालचाल दिसावी, अशी मागणी करण्यात येत आहे.सोमेश्‍वर शांतीपीठ संस्था रत्नागिरीचे कार्यकर्ते राजेश आयरे यांच्या पुढाकाराने शहरात मोकाट असलेल्या गोवंशाचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले. सर्वाधिक जनावरे राजीवडा, जुवे, कर्ला, आंबेशेत परिसरात रस्त्यावर भटकताना आढळली. ३९ जनावरे दिसली. त्या खालोखाल जे. के. फाईल्स, एमआयडीसी परिसरात ३८ गुरे दिसली. टीआरपी कुवारबाव रेल्वेस्टेशन परिसरात ३६ जनावरे आढळून आली. रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा, मिर्‍या किल्ला परिसरात २१ जनावरे मोकाट फिरताना आढळली. लक्ष्मीचौक, झाडगांव, परटवणे भागात फिरणार्‍या जनावरांची संख्या ३४ भरली. घुडेवठार, चवंडेवठार, मांडवी भागात २६ गायी, बैल, वासरे दिसली. बस स्टँड माळनाका, शिवाजीनगर भागात ३३ जनावरे आढळली. भाट्ये परिसरात १९ तर नाचणे परिसरात २७ जनावरे मालकाविना हिंडत असल्याचे लक्षात आले. एकूण २७३ जनावरे सर्वेक्षणात आढळली. कदाचित याहून अधिक जनावरेदेखील असू शकतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button