![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2024/08/download-6-6.jpeg)
माचाळमध्ये सेल्फी काढण्यास पर्यटकांना मनाई
लांजा तालुक्यातील समुद्रसपाटीपासून ३५०० फुटांवर असलेल्या माचाळ या पर्यटनस्थळाच्या ठिकाणी मद्यप्राशन व सार्वजनिक शांतता भंग करणार्यांविरूद्ध लांजा पोलिसांनी कडक कारवाई करण्यासंदभांतील फलक माचाळ येथे लावला आहे. माचाळकडे जाणारा रस्ता हा खोल दरीचा आणि दाट धुक्याचा असल्याने सेल्फी काढण्यासही पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे.पोलिसांच्यावतीने पर्यटकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लांजा पोलिसांनी माचाळ येथे लावलेल्या फलकावर माचाळ हे गाव पर्यटनस्थळ म्हणून घोषित केले आहे. हे ठिकाण उंचावर असल्याने या ठिकाणचा रस्ता अरूंद व चढ उताराचा असल्याने एका बाजूला दरीचा भाग असून रस्त्यावर दरडी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटकांनी आपली वाहने वेग मर्यादित चालवावीत, माचाळ मार्गावर आणि रस्त्यावर खोल दरीचा भाग असल्याने सेल्फी काढू नयेत, सावधगिरी बाळगावी, माचाळ मार्गावर वाहन चालवताना मद्यप्राशन केल्याचे आढळल्यास मोटार वाहन अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सूचित केले आहे. माचाळ पर्यटन ठिकाणी मद्यप्राशन करून कोणी पर्यटकांनी शांतता भंग केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांनी म्हटले आहे.www.konkantoday.com