
आम्हाला कडक निर्बंध लावण्यास भाग पडू नका-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना ची रुग्णसंख्या सातत्यानं वाढत आहे. परिणामी अनेक जिल्ह्यांमध्ये याच पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे निर्बंधही लागू करण्यात आले आहेत. परिस्थिती अशीच कायम राहिली तर, राज्यातही काही अंशी सार्वत्रिक लॉकडाऊन नाकारता येत नाही. याच धर्तीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा एक आवाहन केलं आहे.
कोविडचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी हॉटेल्स, उपाहारगृहे यांनी सहकार्य करावे. लॉकडाऊन करून सगळं बंद करणं आम्हालाही नको आहे. पण, मास्क न घालणे, सुरक्षित अंतर न ठेवणे अशा नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असून आम्हाला कडक निर्बंध लावण्यास भाग पडू नका असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
www.konkantoday.com