
गणेशोत्सवापूर्वी मुंबई ते गोवा महामार्गाचा प्रवास खड्डे मुक्त करावा-खासदार रवींद्र वायकर
गशोत्सवापूर्वी कोकणातील चाकरमान्यांना प्रवासात कोणतेही विघ्नं येऊ नये यासाठी मुंबई ते गोवा महामार्गाचा प्रवास खड्डे मुक्त करावा अशी मागणी शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांनी केंद्रीय रस्ते परिवहन आणि राज्य मार्ग मंत्री नितीन गडकरी यांना केली आहे.यावर गडकरी यांनी आश्वस्थ केल्याने यंदा तरी चाकरमान्यांचा रस्ते मार्गे कोकणाचा जाण्याचा प्रवास खुड्डे मुक्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदा गणेशोत्सवासाठी दोनशेहून अधिक स्पेशल ट्रेन कोकण मार्गावर सोडण्यात येणार आहेत. मात्र या ट्रेनची तिकीटे केव्हाच संपली आहेत.त्यामुळे निदान रस्ते मार्गे तरी एसटी आणि अन्य खाजगी वाहनांनी चाकरमान्यांना कोकण गाठता येणार आहे.गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजविण्यात येतील, असे आश्वासन मंत्री नितिन गडकरी यांनी दिले आहे. या महामार्गाशेजारी ट्रॉमा केअर हॉस्पिटलचे काम लवकर सुरु करून ते पूर्ण करावे, अशी विनंतीही वायकर यांनी मंत्री नितिन गडकरी यांना केली आहे. तसेच डिसेंबरपर्यंत या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईल, असेही मंत्री गडकरी यांनी यावेळी सांगितले.टनेल बांधावे….मुंबई गोवा राज्य मार्गावरील भोस्ते घाट आणि परशूराम घाट येथे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. भोस्ते आणि परुशुराम घाट येथे भूस्खलन होत आहे. त्यामुळे या दोनही ठिकाणी टनेल बांधण्यात यावेत, अथवा रेल्वे मार्गाला लागून समांतर रस्ता बांधावा अशी मागणी देखील वायकर यांनी गड्कारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.