कोकणातून थेट पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याला जोडणार्याबिरमणी-हातलोट घाट निधीअभावी रखडलेलाच
कोकणातून थेट पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याला जोडणार्या तालुक्यातील आंबवली-बिरमणी हातलोट घाटाच्या कामासाठी आजवर कोट्यावधी रुपयांचा चुराडा करूनही काम अपूर्णावस्थेत आहे. सातारा हद्दीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनाला अजून २२ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय घाटातील मार्गाला वनविभागाचाही अडसर उभा ठाकल्याने काम पूर्णतः रेंगाळलेल्या स्थितीत आहे.तालुक्यातील आंबवली-बिरमणी मार्गे हातलोट-सातारा या घाटाची निर्मिती करण्याकरिता २००१ च्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करत कामास प्रारंभही झाला. रस्ते विकास योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या घाटामध्ये ४२.९०० कि.मी. असलेला घाट रत्नागिरी व सातारा जिल्ह्यांना जोडणारा घाट असून ९.१६० कि.मी. प्रस्तावित लांबी घाट विभागातून जाते. त्यापैकी ८.५० कि.मी. लांबी रत्नागिरी जिल्ह्यात समाविष्ट असून त्यापुढील ०.६६० लांबी सातारा जिल्ह्यात समाविष्ट आहे. www.konkantoday.com