आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवात एन. के. कला मंच आणि डीबीजे महाविद्यालयाचा डंका
आसामच्या माजूली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय संगम नृत्य महोत्सवात चिपळुणातील एन. के. कलामंच आणि डीबीजे महाविद्यालयाच्या संघाने चमकदार कामगिरीने यश संपादन केले असून चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा अभिमानाने उंचावले आहे.या महोत्सवामध्ये विविध देशातील संघ सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करताना एन. के. कलामंच संघाने प्रथम क्रमांक प्राप्त करून बेस्ट परफॉर्मन्स पारितोषिकावर आपले नाव कोरले. तसेच डीबीजे महाविद्यालयाच्या (८ काऊंट) संघाने कलामंजिरी पारितोषिकावर नाव कोरले. या दोन्ही संघांची बांगलादेश येथे होणार्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात सादरीकरणासाठी निवड करण्यात आली आहे. www.konkantoday.com