
महाड शहरातील तांबट आळी परिसरात तरुणाच्या डोक्याला गोळी लागून मृत्यू
महाड शहरातील तांबट आळी परिसरात तरुणाच्या डोक्याला गोळी लागून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज (दि. ८) दुपारी एकच्या सुमारास घडली. श्रेयश सुनील नगरकर असे मृत तरुणाचे नाव आहे. संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील जुनी नगरपालिका समोरील इमारतीमध्ये ही घटना घडली. श्रेयश नगरकर याचे वडील सुनील नगरकर यांच्या लायसनधारी बंदुकीतून गोळी लागून त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शहरांमध्ये खळबळ उडाली. श्रेयश याने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपविले की बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याने त्याचा मृत्यू झाला, याचा तपास पोलीस करीत आहेत.