
विनेश फोगाटचं 50 ते 100 ग्रॅम वजन जास्त भरल्यानं तिला ऑलिम्पिकमध्ये फायनलसाठी अपात्र ठरविले
विनेश फोगाटचं 50 ते 100 ग्रॅम वजन जास्त भरल्यानं तिला ऑलिम्पिकमध्ये फायनलसाठी अपात्र ठरवण्यात आलं. फायनलला तिची प्रतिस्पर्धी असलेल्या अमेरिकेच्या कुस्तीपट्टूला आता सुवर्णपदक दिलं जाईल.तर कांस्यपदकासाठी सामना होईल. विनेश फोगाटला अपात्र ठरवल्याने भारताच्या ऑलिम्पिक मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. वजन जास्त असल्यानं तिला अपात्र ठरवलं गेल्यानं आता आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. विनेशच्या कुटुंबियांकडून भारताच्या कुस्ती फेडरेशनवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.ऑलिम्पिकमध्ये फायनलला विनेशला अपात्र ठरवल्यानंतर तिच्या सासऱ्यांनी प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केलीय. विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यामागे कट असल्याची शंका त्यांनी व्यक्त केलीय. विनेशला अपात्र ठरवणं हा कट असल्याचं म्हणत विनेशच्या सासऱ्यांनी फेडरेशनवर गंभीर असे आरोप केले आहेत. विनेश फोगाटने याआधी कुस्तीपटूंच्या आंदोलनात बृजभूषण सिंह यांच्याविरोधात भाग घेतला होता. रस्त्यावर उतरून तिने आंदोलन केलं होतं.