राजापूर तालुक्यातील नाणार पाठोपाठ सागवेतही बॉक्साईट प्रकल्प
राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात प्रस्तावित करण्यात आलेल्या बॉक्साईट प्रकल्पावरून सध्या या परिसरातील वातावरण तापलेले असताना आता सागवे गावातही बॉक्साईट प्रकल्प राबविण्याकरिता ५ सप्टेंबर रोजी कात्रादेवी वाडी येथील मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता पर्यावरणविषयक जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे आता नाणार पाठोपाठ सागवे गावातही खळबळ उडाली आहे.रिफायनरी प्रकल्पावरून नाणार सागवे परिसर मागील काही वर्षे चांगलाच चर्चेत आला होता. नाणारसह लगतच्या १६ गावांमध्ये प्रस्तावित असलेल्या या रिफायनरी प्रकल्पाला जोरदार विरोध झाल्यानंतर हा प्रकल्प रद्द करण्यात आला होता. त्यामुळे नजिकची काही वर्षे हा भाग शांत होता, मात्र काही दिवसांपूर्वी नाणार मे सोशीयेदादे दि फोमेंटो इंडस्ट्रीयल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा बॉक्साईट प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. www.konkantoday.com