
राजापूर तालुक्यातील कळवंडे धरणाची होणार नव्याने बांधणी
राजापूर तालुक्यातील कळवंडे धरणाची नजिकच्या काळात नव्याने बांधणी होणार असल्याची माहिती पुढे येत आहे. पुढील ५० वर्षाचा विचार करून त्याचे नाशिकमध्ये डिझाईन बनवले जात असून हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच हे डिझाईन लघु पाटबंधारे विभागाच्या रत्नागिरी कार्यालयाला प्राप्त होणार असून त्यानंतर पुहडल प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे ५ गावातील ग्रामस्थांना काही वर्षे पाण्याविना राहण्याची वेळ येणार आहे.www.konkantoday.com