*राजापूर उन्हाळे येथील गंगामाई अद्यापही प्रवाहित असल्याने श्रावण मासात राजापुरात गंगास्नानाची संधी
मार्च महिन्यामध्ये आगमन झालेल्या राजापूर उन्हाळे येथील गंगामाई अद्यापही प्रवाहित असल्याने श्रावणमासामध्ये गंगास्नानाची पर्वणी व गंगाजलाने श्रीक्षेत्र धुतपापेश्वरला अभिषेक घालण्याची संधी भाविकांना मिळणार आहे.यापूर्वी गंगामाईचे आगमन होवून सुमारे अडीच वर्षांनी म्हणजे डिसेंबर २०२३ दरम्यान निर्गमन झाले होते. गंगामाईचे पुन्हा एकदा अल्पावधीतच म्हणजे तीन महिन्यात ऐन शिमगोत्सवामध्ये २४ मार्च २०२४ मध्ये आगमन झाले. गेले चार महिने गंगामाईचे वास्तव्यास असून आजही प्रवाहीत आहे. या कालावधीमध्ये लाखो भाविकांनी गंगास्नानाची पर्वणी साधली. मराठी महिना श्रावण हा व्रतवैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. व्रतवैकल्याच्या महिन्यामध्ये स्नान करणे हे पवित्र मानले जात आहे. त्यामुळे यावर्षी हा योग आला असून भाविकांसाठी ती एक पर्वणीच ठरणार आहे. www.konkantoday.com