लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील दीपक नोव्हाकेम या कंपनीने जिल्हारुग्णालयाला व्हेंटिलेटर दिले

लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील दीपक नोव्हाकेम या कंपनीच्या वतीने जिल्हा रुग्णालयाला १८लाख १८हजार रुपयांचा व्हेंटिलेटर देण्यात आला. राज्यात सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत आतापर्यंत लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधून अठरा व्हेंटिलेटर राज्य सरकारकडे देण्यात आले.
राज्यात नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यानंतर लोटे एमआयडीसीने नेहमीच राज्य सरकारला मदतीचा हात पुढे केला आहेरत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आव्हान केल्यावर दीपक नोव्हा कंपनीचे व्यवस्थापक रामराव गायकवाड यांनी आपल्या वरिष्ठ संचालकांशी चर्चा करून १८ लाख १८ हजार रुपयांचा विशेष सुविधा असलेला आणि आवश्यक त्या सर्व एक्सेसरीजसह अद्ययावत व्हेंटिलेटर जिल्हा प्रशासनाकडे हस्तांतरित केला आहे. खेडचे प्रांताधिकारी अविनाश कुमार सोनवणे यांच्याकडे गायकवाड आणि धोंडीराज सावंत यांनी व्हेंटिलेटर सुपूर्त केले
www.konksntoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button