
बिलजीचे दर उतरल्याच्या निषेधार्थ हर्णैत बोटी बंद
दापोली तालुक्यातील हर्णै येथे मत्स्य हंगामाच्या सुरूवातीलाच माशांचे दर घसरल्याने याचा निषेध म्हणून सोमवारी लहान बोटी मालकांनी आपल्या बोटी बंद ठेवल्या. सोमवारी सकाळी एकही बोट समुद्रात मासेमारीकरिता गेली नव्हती.१ ऑगस्ट रोजी मासेमारीचा हंगाम सुरू झाला आहे. पहिले दोन दिवस शंभर रुपये किलो दर बिलजी माशांना मिळत होता. त्यानंतर तो ८५ रुपयांवर घसरला. रविवारी तो ४० रुपयांवर येवून ठेपला. यामुळे मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले आहे. याचा निषेध म्हणून छोटया मच्छिमारांनी आपल्या बोटी बंद ठेवल्याने हर्णै बंदरावर शुकशुकाट पहायला मिळाला. पावसाळी वातावरण असल्यामुळे मोठया बोटी समुद्रात मासेमारी करिता जात नाहीत. त्यामुळे छोट्या बोटींनी मासेमारीला सुरूवात केली आहे. त्यांना बिलजी माशांचा चांला रिपोर्ट मिळत आहे. शिवाय या बिलजी माशांना गोव्यामध्ये चांगली मागणी आहे. मात्र दलाल व सेंटर मालकांनी बिलजीचा दर पाडल्याच्या कारणास्तव मच्छिमारांनी आपला निषेध नोंदवला असल्याचे बोलले जात आहे. www.konkantoday.com