तुम्ही जर शेख हसीनांना संरक्षण देत असाल तर हिंदुंनाही संरक्षण द्या.- उद्धव ठाकरे

* उद्धव ठाकरे हे आज दिल्ली दौऱ्यावर असून आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना बांग्लादेशच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देत सरकारला इशारा देखील दिला. जगभरात जनतेचा संयम सुटतोय, त्यामुळे जनतेच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.उद्धव ठाकरे म्हणाले की, बांग्लादेशमध्ये अराजक निर्माण झालं आहे, त्यामुळे शेख हसीना भारतात आल्या आहेत. तुम्ही जर शेख हसीनांना संरक्षण देत असाल तर हिंदुंनाही संरक्षण द्या. बांग्लादेश मधील हिंदूंचं रक्षण करणं ही देखील केंद्र सरकारची जबाबदारी आहे. संयम सुटल्यावर काय होतं हे बांग्लादेशनं दाखवलंय. जनतेचा संयम सुटतोय, त्यामुळे जनतेच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका.’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button