खेडमध्ये डासप्रतिबंधक फवारणी सुरूच
शहरात डेंग्यू साथीचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता नगरप्रशासन यंत्रणा सतर्क झाली आहे. शहरात डासांची उत्पत्ती होणार्या ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या ठिकाणांसह डोअर टू डोअर डासप्रतिबंधक फवारणी मोहीम अधिक गतीमान करण्यात आली आहे.मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी नागेश बोंडले व नगर परिषदेचे कर्मचारी डेेंग्यू साथीवर विशेष लक्ष ठेवून आहेत. डासांची उत्पत्ती होणार्या ठिकाणी जंतूनाशक फवारणी करून संबंधित बांधकाम व्यावसायिकांना पावसाचे पाणी साचणारे डबके बुजविण्याच्या सूचना केल्या आहेत. www.konkantoday.com