खड्डेमय रस्त्यांमुळे एसटीचे आठ मार्ग बाधित
यावर्षी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली असून वाहने चालवणेही अवघड होवून बसले आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे आता येथील आगाराने आठ मार्गावरील एसटी बसेसची वाहतूक बंद तर काही मार्गावर अर्ध्यांपर्यंत बसेच पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात आगाराने त्या त्या मार्गावरील ग्रामपंचायती, तसेच पंचायत समितीकडेही पत्रव्यवहार केला आहे.प्रवासी वाहतुकीचे केंद्र असलेल्या चिपळूण आगाराच्या बहुतांशी प्रवासी हा ग्रामीण व विद्यार्थी वर्ग आहे. त्यानुसार सर्वांच्या सोईनुसार आगार प्रशासनाने त्या त्या मार्गावर एस.टी. बसफेर्यांचे नियोजन केले आहे. सध्या पावसामुळे ग्रामीण भागातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. याचा फटका वाहनचालकांना बसू लागला आहे. एस.टी. बस चालकांनाही त्याचा त्रास अधिक होवू लागला आहे. खड्डे चुकविण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. यासंदर्भात चालकांच्या आगार प्रशासनाकडे तक्रारी वाढल्या आहेत. परिणामी काही दिवसांपूर्वी या खड्डेमय मार्गाचा आगार प्रशासनाकडून सर्व्हे करण्यात आला. त्यानुसार त्याचा अहवाल देखील तयार करण्यात आला आहे. www.konkantoday.com