कुत्रा अंगावर पडल्याने एका तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
मुंब्य्रात एक दुर्दैवी घटना घडली आहे. कुत्रा अंगावर पडल्याने एका तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. चिमुकली तिच्या घरच्यांसोबत रस्त्यांवरून जात होती. तेव्हा अचानक तिच्या अंगावर वरून कुत्रा पडला.यानंतर ती जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.मिळालेल्या माहितीनुसार, चिमुकली रहदारीच्या रस्त्यावरून आपल्या आईसोबत जात होती. त्यावेळी इमारतीच्या एक मजल्यावरून एका कुत्र्याने खाली उडी घेतली. हा कुत्रा थेट चिमुकलीच्या अंगावर पडला. अंगावर पडल्याने चिमुकली गंभीर जखमी झाली होती. त्यामुळे तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्याचा उपयोग झाला नाही.