शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचा स्वीय सहाय्यक असल्याची बतावणी करुन एका व्यक्तीने बडेमियाच्या मालकाची केली बारा लाखाची फसवणूक
_मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील प्रसिद्ध बडेमिया हे हॉटेल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बडेमिया हॉटेलच्या मालकाची तब्बल १२ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे.शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचा स्वीय सहाय्यक असल्याची बतावणी करुन एका व्यक्तीने बडेमियाच्या मालकाची फसवणूक केली. आरोपीने बिर्याणी आणि गुलाब जामुनसह शेकडो खाद्यपदार्थ मागवून पैसेच दिले नसल्याचे समोर आलं आहे.आरोपीने तसेच रेस्टॉरंट मालकाच्या मुलीला लॉ कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देतो असे सांगत आणखी पैसे मागितले होते. तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.खासदार अरविंद सावंत यांचा स्वीय सहाय्यक असल्याचा दावा करणाऱ्या एकाने बडेमियाचे मालक जमाल शेख यांची लाखोंची फसवणूक केल्याने खळबळ उडाली आहे. आरोपीने जमाल शेख यांच्या यांच्या मुलीला शासकीय विधी महाविद्यालयात प्रवेश देण्याचे आश्वासन देऊन १२ लाखांची फसवणूक केली आहे. या फसवणुकीत खासदाराच्या पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा दावा असलेल्या कॉन्मनने दिलेल्या अन्नासाठी पैसे न देणे समाविष्ट आहे. आरोपीने वेळोवेळी अरविंद सावंत यांच्या कार्यकर्त्यांना जेवण द्यायचे असल्याचे सांगून बिर्याणी आणि गुलाब जामुनदेखील पैसे न देता मागवले होते. याप्रकरणी तक्रार दाखल होताच काळाचौकी पोलिसांनी मंगळवारी सूरज काळव याला अटक करून त्याच्याविरुद्ध फसवणुकीचे चार गुन्हे दाखल केले.