राणापाल येथील जंगलात लोखंडी साखळीने बांधलेल्या स्थितीत आढळलेल्या ‘त्या’ विदेशी महिलेचा तो बनावच

राणापाल येथील जंगलात लोखंडी साखळीने बांधलेल्या स्थितीत आढळलेल्या ‘त्या’ विदेशी महिलेचा तो बनावच असल्याचे तिने दिलेल्या जबाबात स्पष्ट झाले आहे. ती मनोरुग्ण असून तिच्या पासपोर्टची मुदत संपल्याने अमेरिकेत जाण्यासाठी अडचणी येत असल्याने नैराश्येतून हे कृत्य स्वतः केल्याची माहिती तिने जबाबात दिली आहे.सिंधुदुर्गातील सोनुर्ली रोणापाल येथील घनदाट जंगलात अमेरिकन महिला साखळदंडांनी बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती. अन्न पाण्याविना तिची दयनीय अवस्था झाली होती.यानंतर जिल्हासह संपूर्ण देशात खळबळ माजली होती. तसेच याची अमेरिक दुतावासानेही दखल घेतली होती. आता याप्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. मी स्वत:च आपला जीव संपवण्यासाठी जंगलात साखळदंडाने बांधून घेतलं होतं. मला मरायचं होतं,माझा भारतातील व्हिसा संपला होता,अशी कबुली या महिलेने दिल्याने पोलीसही चक्रावले आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी तालुक्यातील जंगलात ही महिला मुसळधार पावसात साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत आढळली होती. तिच्या नवऱ्यानेच तिला मारण्याचा प्रयत्न केल्याचा संशय होता. मात्र या महिलेनेच आता धक्कादायक कबुली दिली आहे. मानसिक आजारपणातून आपण स्वतःला संपवण्यासाठी जंगलात स्वत:ला बांधून घेतल्याचा बनाव केला होता. पण ऐनवेळी मला जीवन संपवणे चुकीचं असल्याचं वाटल्याने बचावासाठी आरडाओरडा केला. त्याचबरोबर महिलेने सांगितले की, तिचे लग्नच झालेले नाही. ती १० वर्षे तामिळनाडूमध्ये राहिली होती. सध्या या महिलेवर मानसोपचार सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button