रक्षाबंधनापूर्वी लाडकी बहीण योजनेचे पैसे होणार जमा
राज्य शासनाकडून राबवण्यात येणार्या लाडकी बहीण योजनेतील दोन महिन्यांचे ३ हजार रुपये रक्षाबंधनापूर्वी खात्यामध्ये जमा होतील. तसेच अन्नपूर्ण योजनेंतर्गत ३ गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्याची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.रत्नागिरीमधील पोमेंडी येथे ग्रामस्थ संवाद कार्यक्रमाला पालकमंत्री उदय सामंत यांी उपस्थिती लावली. यावेळी मार्गदर्शन करताना सामंत म्हणाले की, शासनाच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचल्या की नाही याचा आढावा घेण्यासाठी तुमच्या गावात आलोय. आपण ग्रामीण भागात राहतो, सगळी सोंग करता येतात, मात्र पैशाच सोंग करता येत नाही. शेतकर्यांच्या मुलांना लग्न करण्यासाठी शुभमंगल योजनेंतर्गत २५ हजार रुपयांची मदत करणार आहे. या सगळ्या योजनेचा लाभ घ्या, असेही आवाहन यावेळी केले. www.konkantoday.com