मी बोलेन तेव्हा संजय राऊतांच्या कायमस्वरुपी लक्षात राहील-मनसे अध्यक्ष राज ठाकरें
_मी बोलेन तेव्हा संजय राऊतांच्या कायमस्वरुपी लक्षात राहील, असा पलटवार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राऊतांवर केला आहे. राज ठाकरेंचं राजकारण हे मॅच फिक्सिंगवर असतं, अशी टीका संजय राऊतांनी केली होती.यावर आता राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले.राज ठाकरेंनी विधानसभा निवडणूकीचे रणशिंग फुंकले असून त्यांनी यावेळी स्वबळावर निवडणूका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ते सोमवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. संजय राऊतांनी केलेल्या टीकेबद्दल विचारले असता राज ठाकरे म्हणाले की, “मी योग्यवेळी बोलेन. पण मी बोलेन तेव्हा काही गोष्टी संजय राऊतांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील,” असा सूचक इशाराच त्यांनी दिला आहे.