मध्य रेल्वेने आणखी 20 अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला, गाड्यांचे आरक्षण 7 ऑगस्ट (बुधवार)पासून सुरू होणार
गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी जय्यत तयारी करण्यात येते. चाकरमान्यांनाही आता गावचे वेध लागले आहेत. गणपतीसाठी गावी कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू होते.मध्य रेल्वेकडून दरवर्षी कोकणात अतिरिक्त ट्रेन सोडण्यात येतात. यंदाही चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने 202 गणेशोत्सव स्पेशल गाड्यांची घोषणा केली आहे. मध्य रेल्वेने आणखी 20 अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचे आरक्षण 7 ऑगस्ट (बुधवार)पासून सुरू होणार आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात लाखो भाविक जातात. अशावेळी काही जण बस किंवा ट्रेनने कोकण गाठतात. मात्र, या दरम्यान ट्रेनमध्ये आरक्षित सीट मिळवणे खूप कठिण होऊन जाते. त्यामुळं रेल्वेकडून दरवर्षी जादा ट्रेन सोडल्या जातात. यंदाही मध्य व पश्चिम रेल्वेने फेस्टिव्ह ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या अतिरिक्त फेऱ्यांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस-रत्नागिरी द्वी साप्ताहिक विशेषच्या 8 फेऱ्यांचा समावेश आहे. ही 01031 विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 6.7,13,14 सप्टेंबर या दिवशी रात्री 8वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4.50 वाजता रत्नागिरीत पोहोचेल. तर ही विशेष गाडी रत्नागिरी येथून 7,8,14,15 सप्टेंबर रोजी सकाळी 8.40 वाजता सुटेल आणि एलटीटी येथे त्याच दिवशी संध्याकाळी 5.15 वाजता पोहोचेल. ठाणे, पनवेल, रोहा, पेण, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे ही गाडी थांबेल. – पनवेल-रत्नागिरी साप्ताहिक विशेषच्या ४ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. ही ०१४४३ विशेष गाडी पनवेल येथून ८ आणि १५ सप्टेंबर रोजी ४:४० वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११.५० वाजता पोहोचेल. तसेच ०१४४४ विशेष गाडी रत्नागिरी येथून ७ आणि १४ सप्टेंबर रोजी ५:५० वाजता सुटून आणि पनवेल येथे दुसऱ्यादिवशी १:३० वाजता पोहोचेल. या गाडीला पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबा देण्यात आला आहे.- पुणे – रत्नागिरी साप्ताहिक विशेषच्या ४ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. यामध्ये ०१४४७ विशेष गाडी पुणे येथून ७ आणि १४ सप्टेंबरला ००.२५ वाजता सुटून रत्नागिरीला सकाळी ११.५० वाजता पोहोचेल. तसेच ०१४४८ विशेष गाडी रत्नागिरी येथून ८ आणि १५ सप्टेंबर रोजी ५:५० वाजता सुटून पुणे येथे दुसऱ्या दिवशी ५:०० वाजता पोहोचेल. ही ट्रेन चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबेल.- पनवेल रत्नागिरी साप्ताहिक विशेषच्या २ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. ०१४४१ विशेष गाडी ११ सप्टेंबर रोजी ४:४० वाजता पनवेल येथून सुटून रत्नागिरी येथे ११:५० वाजता पोहोचेल. तर ०१४४२ विशेष गाडी १० रोजी ५:५० वाजता रत्नागिरी येथून सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी १:३० वाजता पोहोचेल.- पुणे – रत्नागिरी साप्ताहिक विशेषच्या २ फेऱ्याही चालवण्यात येणार आहेत. यामध्ये ०१४४५ विशेष गाडी १० रोजी पुणे येथून ००:२५ वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११.५० वाजता पोहोचेल.या सर्व गणपती विशेष रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण ७ ऑगस्ट रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर विशेष शुल्कावर सुरू होईल, असे मध्य रेल्वेकडूनविशेष शुल्कावर सुरू होईल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.२० गणेशोत्सव विशेष रेल्वेगाड्या