बनावट नोटा छपाई प्रकरणात एमआयडीसी मधील प्रिटिंग प्रेसमध्ये प्रसाद राणे याने मार्च ते जुलै या कालावधीत एकूण 7 लाख 36 हजार रुपयांच्या नोटा छापल्या
बनावट नोटा छपाई प्रकरणात एमआयडीसी मधील प्रिटिंग प्रेसमध्ये प्रसाद राणे याने मार्च ते जुलै 2024 या कालावधीत एकूण 7 लाख 36 हजार रुपयांच्या 500,200,100 बनावट नोटांची छपाई केल्याची धक्कदायक माहिती मुंबई क्राईम ब्रांचच्या तपासात पुढे आली आहे.4 लाखांच्या बनावट नोटांच्या छपाईसाठी त्याला इतर संशयित आरोपींकडून 1 लाख रुपयांचे कमिशन मिळत होते.काही दिवसांपूर्वी मुंबई मानखुर्द येथे बनावट नोटा सापडल्याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचने चार जणांना अटक केली होती. त्यांच्याकडील चौकशीत त्यांना चिपळूण नागरि पतसंस्थेचा व्यवस्थापक अमित कासारचे नाव पुढे आले. कासारच्या चौकशीत या सर्व बनावट नोटांची छपाई रत्नागिरीतील एमआयडीसी येथे प्रसाद राणे आपल्या प्रिंटिंग प्रसेमध्ये करत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री प्रसाद राणेच्या घरी धाड टाकून त्याचे प्रिंटिग मशिन, लॅमिनेशन मशीन आणि कॉम्प्युटर जप्त केले होते.