कुणकेश्वर समुद्रात 10 नॉटीकल मैल अंतरावर एक महाकाय जहाज थांबले
कुणकेश्वरजवळील समुद्रात सोमवारी एक महाकाय जहाज दिसल्याने एकच खळबख उडाली होती. तसेच याबाबत अनेक तर्कवितर्क करण्यात येत होते. पोलीस आणि कस्टम विभागाने या जहाजाबाबत माहिती घेतली. त्यानंतर ते मालवाहतूक जहाज असून त्यात संशयास्पद काहीही नसल्याची माहिती मिळाली.त्यामुळे सुरक्षा यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला आणि याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला.श्रावणातील पहिल्याच सोमवारी कुणकेश्वर तीर्थक्षेत्री कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यावेळी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कुणकेश्वर समुद्रात 10 नॉटीकल मैल अंतरावर एक महाकाय जहाज थांबलेले दिसले. त्यामुळे सुरक्षा यंत्रणाही अलर्ट झाली. तात्काळ पोलीस व कस्टम विभागाने कोस्टगार्डची मदत घेत जहाजाबाबत माहिती मिळवली. ते मालवाहतूक जहाज असून मुंबई न्हावाशेवा येथे जात असल्याचे व जहाजावर संशयास्पद काहीही नसल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली. यामुळे सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा निश्वास सोडला. ते जहाज अर्धा ते पाऊण तासानंतर मुंबईच्या दिशेने रवाना झाले.