
केंद्राने दिलेल्या निधी पैकी राज्यातील ठाकरे सरकारने एक रुपयासुद्धा लोकांसाठी खर्च केला नाही-देवेंद्र फडणवीस
कोरोनाविरोधात लढण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला आतापर्यंत कोट्यवधींची मदत केली आहे. अशा कठीण काळात एवढा निधी दिल्यानंतरही राज्य सरकारची ओरड सुरू आहे. राज्यातील ठाकरे सरकारने यातील एक रुपयासुद्धा लोकांसाठी खर्च केला नाही, असा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
विदर्भातील सर्व खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनी ऑडिओ ब्रिजद्वारे बैठक घेतली. यात त्यांनी दिल्या जाणाऱ्या मदतीचा आढावासुद्धा घेतला. केंद्र सरकारने वेळोवेळी 468 कोटी, सोळाशे कोटी तसेच दोन हजार 684 कोटी रुपयांची मदत आतापर्यंत केली आहे.
www.konkantoday.com