अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना योजनांचे ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत करण्याचे आवाहन* *रत्नागिरी, दि. 5 (जिमाका) : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये शालांत परीक्षेत्तर स्तरावर प्रवेश घेणाऱ्या अनुसुचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी महाडीबीटी प्रणालीवर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, राज्य शासनाच्या शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, राजर्षी शाहू महाराज मॅट्रिकोत्तर गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकत असलेल्या अनुसूचित जातीच्या मुलामुलींना निर्वाह भत्ता (विद्यावेतन) या योजनांचे ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत करावे, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.

* चालू शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता महाडीबीटी पोर्टलवरून योजनांच्या नवीन (Fresh) व नुतनीकरण (Renewal) अर्जाची ऑनलाईन स्वीकृती २५ जुलै रोजीपासून सुरू करण्यात आलेली आहे. तदनुसार मॅट्रिकोत्तर स्तरावर प्रवेश घेणारे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी व संबंधित महाविद्यालये यांनी अर्ज नोंदणीची कार्यवाही करावयाची आहे. सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, राज्य शासनाच्या शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, राजर्षी शाहू महाराज मॕट्रिकोत्तर गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकत असलेल्या अनुसूचित जातीच्या मुलामुलींना निर्वाह भत्ता (विद्यावेतन) इत्यादी योजना माहिती व तंत्रज्ञान विभाग महाराष्ट्र शासन यांनी विकसित केलेल्या महाडीबीटी पोर्टल (वेबसाईट:-https://mahadbt.maharashtra.gov.in/) या प्रणालीद्वारे ऑनलाईनरीत्या राबविण्यात येत आहेत. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता महाडीबीटी पोर्टलवरून योजनांच्या नवीन (Fresh) व नुतनीकरण (Renewal) अर्जाची ऑनलाईन स्वीकृती २५ जुलै रोजीपासून सुरू करण्यात आलेली आहे. तदनुसार मॅट्रिकोत्तर स्तरावर प्रवेश घेणारे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी व संबंधित महाविद्यालये यांनी अर्ज नोंदणीची कार्यवाही करावयाची आहे. या योजनांचे अर्ज भरण्याकरिता पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत:- महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा, मागील अभ्यासक्रमात उत्तीर्ण झाल्याचा पुरावा / गुणपत्रिका, जातीचा दाखला, सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेला उत्पन्न दाखला, शाळा सोडल्याचा मूळ दाखला/ ट्रान्सफर सर्टिफिकेट, जात वैधता प्रमाणपत्र (व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी), कँप राउंड सर्टिफिकेट (व्यावसायिक अभ्यासक्रम शैक्षणिक शुल्क प्रतीपूर्ती योजनेसाठी), शैक्षणिक खंड प्रमाणपत्र (लागू असल्यास) योजनांचे अर्ज महाविद्यालयाने नोंदणीकृत करून घेणे हा प्रवेश प्रक्रीयेचाच भाग असून अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या दिवशीच विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरून घेऊन त्यावर कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button