सिंधुदुर्गात दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

सिंधुदुर्गात दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात अखेर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला यश आले. नितीन अशोक पाळेकर (रा.मुटाट, देवगड) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याला कणकवली येथील एका हॉटेलमधून ताब्यात घेत त्याच्याकडून मालवण, सिंधुदुर्गनगरी येथील तीन दुचाकी हस्तगत केल्या. त्यांनी संशयिताला सिंधुदुर्गनगरी पोलिसांच्या ताब्यात दिले.दरम्यान, पाळेकरचा अन्य गुन्ह्यांत हात आहे का, त्याचे आणखी साथीदार आहेत का याचा तपास सुरू आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button