पोचरी येथील नुकसानग्रस्ताना पालकमंत्री उदय सामंत आणि सिंधुरत्न योजना समितीचे सदस्य किरण सामंत यांच्याकडून मदतीचा हाथ
*पोचरी येथील नुकसानग्रस्ताना पालकमंत्री उदय सामंत आणि सिंधुरत्न योजना समितीचे सदस्य किरण सामंत यांच्याकडून मदतीचा हाथ मुसळधार पाऊस आणि चक्री वादळाचा तडाखा संगमेश्वर तालुक्यातील खाडी पट्टा भागातील पोचरी गावाला बसला. येथील नुकसानग्रस्ताना पालकमंत्री उदय सामंत आणि सिंधुरत्न योजना समितीचे सदस्य किरण सामंत यांच्याकडून मदतीचा हाथ देण्यात आला.अचानक ओढवलेल्या या चक्री वादळाने झालेले नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना धीर देत, त्यांचे मनोबल वाढवून, आलेल्या आपत्तीशी धीराने दोन हात करूयात असा मानसिक आधार सामंत बंधून दिला. या आपत्तीची माहिती शिवसेना शाखा प्रमुख अक्षय देसाई यांनी मंत्री सामंत यांना दिली होती. मदत देताना माजी नगरसेवक सुदेश मयेकर, उपजिल्हाप्रमुख राजेश मुकादम, विभाग प्रमुख महेश देसाई, विभाग संघटक मनमोहन देसाई, सरपंच भारती धामणे उपस्थित होते.