![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2024/07/download-29-2.jpeg)
पांगारी येथे प्रौढाचा मृत्यू
दापोली तालुक्यातील पांंगारी विठ्ठलवाडी येथील अशोक बबन जाधव या ५२ वर्षीय प्रौढाचा खाडीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार दि. ३ ऑगस्ट रोजीउघडकीस आली. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक जाधव हे ३० जुलै रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास पांगारी जेटी येथे गेले होते. तेथून ते पुन्हा घरी न आल्याने त्यांची शोधाशोध करण्यात आली होती. ते कोठेही आढून न आल्यामुळे दापोली पोलिसांत ते बेपत्ता झाल्याचे दाखल करण्यात आले होते. ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास पांगारी वाघ शेपटी येथे खाडीकिनारी खाडीच्या पाण्यात अशोक जाधव यांचा बुडून मृत्यू झाल्याचे आढळले. दापोली पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.www.konkantoday.com