रत्नागिरी शहरातील शहर वाहतूक व अन्य बसेस डिझेल संपल्याने जाग्यावर उभ्या असल्याचे दृश्य संध्याकाळपासून दिसत आहेत नेहमी सुटणाऱ्या गाड्या सुटल्या नसल्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला मात्र एवढी आणीबाणीची परिस्थिती का निर्माण झाली याबाबत अधिकाऱ्यांनी कोणताही खुलासा अद्याप केलेला नाही त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांची मोठी गैरसोय झाली अनेकांनी वाट पाहून खाजगी वाहने व रिक्षाची वाट धरली त्यामुळे रिक्षाचालकांचा भाव वाढला एसटीची डिझेल टंचाई अचानक कशी काय झाली याबाबत खुलासा झालेला नाही मात्र अनेक गाड्या सुटल्या नसल्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल झाले आहेत आता उशिरा डिझेल उपलब्ध झाल्याचे वृत्त आहे आता काही एसटी बसेस सुटत असल्याचे दिसत आहे मात्र अनेक बसेस रद्द झाल्या आहेत याबाबत जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्या कानावर हा प्रकार घालण्यात आलेला आहे रत्नागिरी विभागात लाखो रुपयाचे डिझेल दिवसा लागते ही परिस्थिती का निर्माण झाली याचा एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी खुलासा करणे गरजेचे आहे