एकतर हप्ता वसुली करा किंवा नोकरी करा- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा अधिकाऱ्यांना इशारा

जनतेकडून टॅक्स घेता सुविधा देत नाही, अतिक्रमण न काढण्यासाठी हप्ते घेता, हप्ता हवा की नोकरी असा थेट इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिला तर रक्षा खडसे यांनी गड्डे भुजवणार नसेल तर गडकरींना पत्र लिहून कार्यमुक्त करण्याचा इशारा दिला.जनतेला तर बसतोच पण मंत्र्यांना देखील मनस्ताप होत आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा अधिकाऱ्यांना दमसरकारी काम आणि सहा महिने थांब हे वाक्य आपण अनेकदा ऐकलं असेल. सरकारी कार्यालयात आपली फाईल पुढे सरकवण्याकरता अनेकांच्या चपला झिजून जातात असा अनुभव नागरिकांना आहे. मात्र, आता हा अनुभव सामान्य नागरिकांपुरता मर्यादित राहिलेला नसून हा अनुभव आता खुद्द सरकारमधील मंत्र्यांना यायला लागलेला आहे. मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून ओळख असलेल्या नितीन गडकरींना देखील कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणाचा आज फटका बसला. नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात नितीन गडकरी यांनी आज जनता दरबार घेतला होता. या जनता दरबारात हजारो नागपूरकरांनी आपल्या समस्येचा पाढा गडकरींसमोर वाचला. हा पाढा पाहून अखेर गडकरींचा संताप अनावर झालानागपूर शहरातील सीताबर्डी परिसरातील अतिक्रमण काढलं जात नाही आणि ते अतिक्रमण न काढण्यासाठी मनपा कर्मचारी हप्ता घेतात. एकतर हप्ता वसुली करा किंवा नोकरी करा असा कडक इशारा या जनता दरबारात नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button