श्रावणात भाज्या महागल्याने गृहिणींचे बजेट बिघडणार
महागाईमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर भडकले आहेत. कडधान्य, डाळींचे दर आधीच वाढलेले आहेत. त्यातच भाज्यांचे दर भाव खात असल्याने ग्राहकांच्या खिशाला चाट बसणार आहे. गेले दोन महिने भाज्यांच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. कडधान्यांचेही दर वाढलेले असले, तरी दोन महिने दर स्थिर आहेत. तेलाचे दरही बेताचे आहेत. सोमवारपासून श्रावण सुरू होत आहे. सणासुदीचे दिवस सुरू होत असून या काळात भाज्या, फळांचा खप होतोगेल्या दोन आठवड्यापासून कांदा, बटाटा, लसूण दरात वाढ झाली आहे. कांदा ५० ते ५५ रुपये तर बटाटा ४५ रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. १०० रुपयांना दोन किलो कांदे, तर बटाटे अडीच किलोप्रमाणे विकण्यात येत आहे. लसूण दरात किलोमागे शंभर रुपयांची वाढ झाली असून, ४०० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. दरवाढीचा फटका सर्वांनाच बसत आहे. पाले भाजीच्या जुड्या देखील ३० ते ४० रुपये दराने विकल्या जात आहेत