भारतीय हॉकी संघाचा पराक्रम! पेनल्टी शूटआउट मध्ये ब्रिटनवर विजयासह उपांत्य फेरीत!!

भारतीय हॉकी संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्रिटनचा पराभव करून मोठा पराक्रम केला आहे. त्याचबरोबर सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठली. चार क्वार्टर संपल्यानंतर दोन्ही संघांचा स्कोअर १-१ असा बोरबरीत होता. ज्यामुळे निर्धारित वेळेपर्यंत दोन्ही संघांनी आघाडी घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. यानंतर पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. ज्यामध्ये भारताने ब्रिटनचा ४-२ असा पराभव केला.या सामन्यात भारत १० खेळाडूंसह खेळत होता कारण अमित रोहिदासला दुसऱ्या क्वार्टरमध्ये रेड कार्ड मिळाल्यामुळे तो संपूर्ण सामन्यातून बाहेर पडला होता. मात्र, भारतीय संघाने हार न मानता अखेरपर्यंत ब्रिटनला कडवी झुंज दिली. अशा प्रकारे भारतीय संघाने पदकाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. भारत उपांत्य फेरीत विजय मिळवण्यात यशस्वी ठरला, तर किमान रौप्यपदक निश्चित होईल. भारताचा उपांत्य फेरीचा सामना मंगळवार, ६ ऑगस्ट रोजी होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button