बनावट नोटांचे कनेक्शन लांजात देखील असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू
बनावट नोटांच्या छपाई प्रकरणी रत्नागिरी येथे एकाला अटक करण्यात आल्यानंतर या बनावट नोटांची पाळेमुळे लांजा देखील असल्याची चर्चा सुरू आहे. या दृष्टीने पोलिसांनी तपास करण्याची मागणी आता केली जात आहे .बनावट नोटांच्या छपाई प्रकरणी गुन्हा शाखेने रत्नागिरी येथील प्रसाद राणे याला अटक केली होती. या बनावट नोटांचे कनेक्शन लांजा देखील असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. काहीच दिवसांपूर्वी लांजा येथील एका व्यापाऱ्याला ५०० रुपयांच्या ५१ नोटा म्हणजे २५ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा सारस्वत बँकेच्या कॅश डिपॉझिट मशिन मध्ये भरून बॅंकेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होताम्हणजेच पाचशे रुपयांच्या बनावट नोटा लांजा येथे चलनात असल्याचे त्यावरून सिद्ध झाले होते. पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट आहे किंवा त्या छुप्या पद्धतीने वापरात आहेत, हे त्या घटनेवरून सिद्ध झाले होते.आता रत्नागिरी येथे प्रसाद राणे या व्यक्तीला बनावट नोटांच्या छपाई प्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर लांजा देखील अशा बनवट नोटांची पाळेमुळे असल्याची चर्चा सुरू आहे.