पोलिसांच्या तावडीतून फरारी झालेल्या बांगलादेशी युवकाला पोलिसांनी परत पकडले
लघुशंका आल्याचे सांगून लघुशंकेला जात असताना पोलिसांच्या हाती तुरी देऊन एक बांगला देशी युवक सावंतवाडी न्यायालयीन परिसरातून फरार झाला. तो भारतात अनधिकृत वास्तव्यास होता.शानो सरकार असे या संशयिताचे नाव आहे. अखेर बांदा पोलिसांनी सायंकाळी या फरार बांगला देशी युवकाला इन्सुली पोलिस तपासणी नाक्यावर पकडले.बांगला देशी युवकाला भारतात बेकायदेशीरीत्या राहत असल्याच्या आरोपाखाली काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्याच्यावरील गुन्हा प्रकरणी सावंतवाडी न्यायालयात खटला सुरू आहे. शनिवारी सकाळी पोलिसांनी त्याला सुनावणीसाठी सावंतवाडी न्यायालयात आणले होते. दुपारच्या दरम्याने त्याने आपल्याला लघुशंकेला जायचे आहे असे सांगत पोलिसांना चकवा देत न्यायालयीन परिसरातून पलायन केले.संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले. आरोपी फरार झाल्याने जिल्हा हाय अलर्टवर ठेवण्यात आला होता. शनिवारी संध्याकाळी नाकाबंदी इन्सुली येथील पोलीस तपासणी नाक्यावर पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुरणे, पोलीस कर्मचारी राकेश चव्हाण, मयुरेश कमद्नुरे, नरेश कुडतरकर, संजय हुंबे, राजेश गवस यांना सदर आरोपी महामार्गावरून धावतताना दिसला. यावेळी पोलीस कर्मचारी राकेश चव्हाण यांनी सदर आरोपीचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले