जि.प.चेआदेश पंचायत समिती धुडकावतेय
निवृत्त वेतनातून कपात केलेली रक्कम व्याजासह अदा करण्याचे आदेश जिल्हा परिषद स्तरावरून दिले गेलेले असतानाही येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मात्र ते धुडकावत आहेत. रक्कम मिळण्यासाठी निवृत्त ग्रामसेवक शांताराम राणीम गेली ४ वर्षे हेलपाटे मारूनही कुणी दाद देत नसल्याने अखेर १५ ऑगस्ट रोजी त्यांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.यासंदर्भात राणीम यांनी येथील गटविकास अधिकार्यांना भेटून निवेदन सादर केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ते पंचायत समिती अंतर्गत नायशी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक म्हणून कार्यरत होतो. पंचायत समिती प्रशासनाकडून त्याच्याविरूद्ध २९ जानेवारी २००७ रोजी न्यायालयात दावा दाखल करण्यात आला. त्यामुळे निवृत्तीवेतनातून १ लाख ३० हजार रुपयांची कपात करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने या दाव्याबाबतचा निकाल ११ फेब्रुवारी २०२० रोजी त्यांच्या बाजूने दिला.www.konkantoday.com