
२१ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी ऑक्टोबर २०२४ पासून
शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने घेण्यात येणार्या २१ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी ऑक्टोबर २०२४ पासून विविध १० केंद्रांवर डिसेंबर २०२४ पासून आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धांसाठी नाट्य संस्थांकडून १ ऑकस्ट ते २६ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेशिका मागवण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी दिली.नोव्हेंबर २०२४ पासून सुरू होणार्या हौशी हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धेसाठी नाट्य संस्थांकडून ऑनलाईन पद्धतीने प्रवेशिका मागविण्यात येणार आहेत. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगुंटीवार व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे चवरे यांनी नमूद केले आहे.www.konkantoday.com