शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी ६ ऑगस्टला
नवी दिल्ली : शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी येत्या ६ ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेळापत्रकात दोन्ही सुनावण्यांची तारीख एकाच दिवशी दर्शवण्यात आली आहे. दोन्ही सुनावण्या एकाच दिवशी होणार असल्या तरी दोन्ही सुनावण्या स्वतंत्रपणे होणार आहेत.*राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी जेव्हा शेवटची सुनावणी झाली. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण यांची सुनावणी एकाच दिवशी होणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या वेळापत्रकात यापूर्वी दोन पक्षांच्या आमदार अपात्रता सुनावणीची तारीख वेगवेगळी दाखवण्यात आली होती. *’यांच्या’ खंडपीठांसमोर होणार सुनावणी*मात्र, आज पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाच्या वेळापत्रकात दोन्ही सुनावण्यांची संभाव्य तारीख ही ६ ऑगस्ट दाखवण्यात आली आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायाधीश जे. बी. पारडीवाला आणि न्यायाधीश मनोज मिश्रा यांच्या खंडपीठांसमोर होणार आहे. https://chat.whatsapp.com/JdTscwkK04n3RWNSijpnIq