
लांजा तालुक्यात बिबट्यांकडून होणारे नुकसान रोखण्यासाठी वन विभागाकडून कुवे, वडगाव, वेरवली या गावात ट्रॅप कॅमेरे
लांजा तालुक्यात बिबट्यांकडून होणारे नुकसान रोखण्यासाठी वन विभागाकडून कुवे, वडगाव, वेरवली या गावात बिबट्यांच्या संचारावर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत.बिबट्यांकडून शेतकर्यांचे होणार्या नुकसानीची नुकसान भरपाई देण्याचा अहवाल वरिष्ठांकडे देण्यात आला आहे. तालुक्यात गेल्या काही वर्षात बिबट्यांची संख्या वाढली आहे. वन विभागाची जागृती आणि जंगल भाग झाडी वाढल्याने तसेच फासकी लावून जंगली प्राण्यांची शिकार करण्याचे प्रमाण कमी झाल्याने बिबट्यांची वाढ झाली आहे. अनेक बिबटे भक्ष्य शोधण्यासाठी नागरी वस्तीकडे येवू लागले आलेत. कुत्री मांजरे यांच्यावर हल्ले वाढले आहेत. पाळीव जनावरांवर हल्ले होण्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत. www.konkantoday.com