मिरजोळे गावातील सर्व विकासकामे करण्यासाठी मी प्रामाणिक पणे प्रयत्न केला: उदय सामंत पंधराशे कोटीचा कोकोकोला प्रकल्प आपल्या रत्नागिरी तालुक्यातील आणतोय:- उदय सामंत
रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे गावाच्या विविध समस्या संवाद कार्यक्रमाला रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती लावली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांचे वाजता गाजत स्वागत करण्यात आले.पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते यावेळी नवनिर्वाचित सरपंच रत्नदीप पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला ते म्हणाले,मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे काम मिरजोळे मध्ये ८० % पूर्ण झाले असून ते १००% पूर्ण करा. येणाऱ्या रक्षाबंधनच्या अगोदर जुन आणि जुलै महिन्याचे ३ हजार रुपये जमा होणार आहेत. ही योजना कायम सुरु राहणार आहे. येणारी विधानसभा सभा ही आपली असून आपल्या गावातील प्रत्येक घरा घरात उदय सामंत आहे असेल समजून मतदान करा.शासनाच्या विविध योजनेचा लाभ आपल्या प्रयत्न पोचवण्याचे काम मी आणि माझी टीम प्रामाणिक पणे करत आहे.निष्ठा कशी असावी हे मिरजोळे वासीनी दाखवून दिले. सरपंच पदाचा दिलेला शब्द कार्यकाळ संपल्यावर तात्काळ राजीनामे देणारे प्रामाणिक कार्यकर्ते माझ्या बरोबर आहे याच जोरावर मी महाराष्ट्रमध्ये काम करतोय असे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले. मिरजोळे गाव विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या पाठीशी राहणार असल्याचा ग्रामस्थांनी निर्धार केला आहे. मिरजोळे वासियांच्या सुखदुःखात तुमचा आमदार उदय सामंत भक्कम पणे उभा राहत आहे.मिरजोळे गावातील सर्व विकासकामे करण्यासाठी मी प्रामाणिक पणे प्रयत्न केला असून नवनिर्वाचित सरपंच रत्नदीप पाटील जी विकास कामांची यादी देतील त्यांना निधी देण्याचे काम तुमचा आमदार म्हणून प्रामाणिक पणे करणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.रत्नदीप पाटील यांनी सरपंच पदाच्या मिळालेल्या संधीचे सोने करावे.ते पुढे म्हणाले,*मी कबड्डीचा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे मात्र तिकडे सर्व्हिस घालत नाही मात्र मी राजकारणात सर्व्हिस मारली की भल्या भल्याना आपल्याकडे आणतो आणि ती सुरवात झाली आहे.विरोधात काम करणारे सेंटर लाईन वर उभे आहेत ते लवकरच आपल्या बरोबर दिसतील.कबड्डी खेळणाऱ्या खेळाडूवर यापुढे अन्याय होणार नाही याची ही दक्षता अध्यक्ष या नात्याने घेणार आहे. यावेळी जिल्हा प्रमुख राहुल पंडित, तालुका प्रमुख बाबू म्हाप, युवासेना तालुका प्रमुख तुषार साळवी, विभाग प्रमुख प्रवीण पवार, महिला विभाग प्रमुख पंडिये मॅडम, सरपंच रत्नदीप पाटील, शंकर पाटील, फैय्याज मुकादम, राजू तोडणकर, गजानन गुरव, मुन्ना घोसाळे, सुनील घोसाळे, हर्षराज पाटील,तसेच ग्रामस्थ, पदाधिकारी, महिला भगिनी उपस्थित होते.