भूमिगत वीजवहिनी टाकण्याच्या कामामध्ये भोंगळ कारभारामुळे नागरिकांना सहन करावा लागतोय त्रास
_महावितरणकडून होत असलेल्या भूमिगत वीजवहिनी टाकण्याच्या कामामध्ये भोंगळ कारभारामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रांताकडे रितसर तक्रार देऊनही कोणतीच कार्यवाही दिसून येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.अतिवृष्टीच्या काळात आपत्तीत वीजवाहिनीसह विजेचे खांब तुटून पडतात. यामुळे वीजपुरवठा खंडित होऊन महावितरणचे मोठे आर्थिक नुकसान होते. याला पर्याय म्हणून महावितरणकडून किनारपट्टी भागात भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यात येत आहेत; मात्र हे काम निकषाप्रमाणे होत नसल्याने पावसात या वीजवाहिन्या उघड्यावर पडल्या आहेत. या वीजवाहिन्यांचे काम करताना साईडपट्टीची खोदाई केल्यामुळे तालुक्यात दाभोळ, कर्दे, आंजर्ले, लाडघर आदी ठिकाणी रस्त्यांची दूरवस्था झाली आहे