
दापोलीच्या सुपारी बागायतदारांचे पावसामुळे नुकसान
गेल्या आठवड्यात झालेल्या धुवॉंधार पावसाने व सोसाट्याच्या वार्याने तालुक्यातील सुमारे २४ गावांतील सुपारी बागायतदारांच्या १,९५० सुपारीच्या झाडांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती दापोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष मधुकर दळवी यांनी दिली आहे. तसेच या सुपारी बागायतदारांना नुकसान भरपाई मिळावी व यासाठी आग्रही राहणार असल्याचे दळवी यांनी सांगितले.दापोली तालुक्यासह जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यात धुवॉंधार पाऊस झाला. यामध्ये सर्वच स्तरांवर मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले आहे. यामध्ये तालुक्यातील सुपारी बागायतदार भरडला गेला आहे. www.konkantoday.com