चिपळुण- संगमेश्वर विधानसभा मतदार संघासाठी उबाठा कडून इच्छुकांची संख्या वाढली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बनें व राजू महाडिक इच्छुकांच्या शर्यतीत
चिपळुण- संगमेश्वर विधानसभा मतदार संघासाठी उबाठा कडून इच्छुकांची संख्या वाढली असून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बनें व राजू महाडिक हे इच्छुकांच्या यादीत असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे मातोश्री कडून कुणाला आशीर्वाद मिळणार याकडे आता लक्ष लागले आहे संगमेश्वर तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक नेतेमंडळीच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक २ ऑगस्ट रोजी देवरुख येथील मराठा भवन मध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. यामध्ये शिवसैनिकांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे. तर चिपळूण मधील कार्यकर्त्यांनी देखील रोहन बनेंच्या नावाला पाठिंबा देत पसंती दर्शवली आहे. या मेळाव्यामध्ये सह संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी देखील आपण इच्छुक असल्याचे स्पष्ट केले.देवरुख मराठा भवन येथे घेण्यात आलेल्या या बैठकीमध्ये व्यासपीठावर माजी राज्यमंत्री रवींद्र माने, जिल्हाप्रमुख विलास चाळके, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, रत्नागिरी सिंधुदुर्ग महिला संघटक नेहा माने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, जिल्हा महिला संघटक वेदा फडके, माझी जिल्हा परिषद अध्यक्ष रचना महाडिक, संतोष थेराडे, माजी सभापती विनोद झगडे, संगमेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती जया माने, संगमेश्वर तालुका प्रमुख बंड्या उर्फ नंदादीप बोरुकर, सुजित महाडिक, दिलीप सावंत, प्रद्युम्न माने, स्मिता लाड आदिंसह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.अनेक पदाधिकाऱ्यांसह माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी देखील संगमेश्वर तालुक्यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला तिकीट मिळावे यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे ताकदीनिशी मागणी करणार असल्याचे नमूद केले. आणि निश्चितपणानं तालुक्यातून आमदार निवडून आणू असाही आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी अनेकांची मनोगत व्यक्त केली.माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने व तालुकाप्रमुख नंदादिप बोरुकर यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला शिवसैनिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गेले अनेक वर्ष संगमेश्वर तालुक्याचा आमदार होऊ न शकल्यामुळे विकास कामाला मर्यादा येऊ लागल्या आणि म्हणून तालुक्यातीलच भावी आमदार असावा असा निश्चय या बैठकीतील शिवसैनिकांनी अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.