गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांची दुरुस्ती- मुख्याधिकारी तुषार बाबर
गणेशोत्सवापूर्वी रत्नागिरी नगरपरिषदेकडून शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण करण्यात येत आहे. पावसाचे प्रमाण जसे कमी होईल त्याप्रमाणे शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे पावसाळी डांबर, खडी वगैरे साहित्य आदींचा वापर करून गणेशोत्सवापूर्वी काम पूर्ण करण्याची कार्यवाही सुरु आहे. अशी माहिती मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी दिली.रत्नागिरी शहरामध्ये अतिवृष्टीमुळे विविध भागातील रस्त्यांना फार मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. सद्यस्थितीत अद्यापपर्यंत दररोज नगर परिषदच्या बांधकाम विभागाकडून डबर कच, पावसाळी डांबर, खडी वापरुन खड्डे बुजविणेचे काम सातत्याने सुरु आहे.