खेड पोलीस कर्मचारी नवीन वसाहतीसाठी ४२ कोटींचा निधी मंजूर
जनतेच्या सुरक्षिततेसाठी झटत असलेल्या खेड येथील पोलीस कर्मचार्यांची वसाहत अखेरची घटका मोजत आहे. मात्र आता नवीन पोलीस कर्मचारी वसाहत उभारण्यासाठी ४२ कोटी ५० लाख रूपयांच्या निधीस मान्यता मिळाली आहे. यामुळे यासाठी शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलेला सततचा पाठपुरावा व आमदार योगेश कदम यांचे प्रयत्न सार्थकी लागले आहेत. लवकरच नवीन वसाहत उभारणीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. यामुळे पोलिसांच्या निवार्याचा प्रश्न संपुष्टात येणार आहे.www.konkantoday.com