उद्धव ठाकरे यांचा डोक्यावरचा ताबा सुटला आहे-देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राचे राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. सध्या सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याचे दिसत आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यातील भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपवर जोरदार टीका केली. आता या टीकेला देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे.उद्धव ठाकरे यांचा डोक्यावरचा ताबा सुटला आहे. ते अत्यंत तणावात जगत आहेत आणि त्या तणावामुळे ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहेत, याच्यावर आपण काय उत्तर देणार? एखादा व्यक्ती डोकं बिघडल्यासारखं बोलतो, त्यावर उत्तर द्यायचं नसतं. पण हे भाषण करुन अमित शाहांनी ज्या औरंगजेब फॅन क्लबचा उल्लेख केला होता, त्याच औरंगजेब फॅन क्लबचे उद्धव ठाकरे आहेत, हे त्यांनी दाखवून दिलं, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button