
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून असणारा उमेदवार हा धनुष्यबाणावर की कमळावर संभ्रम कायम
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून असणारा उमेदवार हा धनुष्यबाणावर की कमळावर निवडणूक लढवणार, याबाबत संभ्रम कायम असतानाच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा उमेदवार हा धनुष्यबाणाच्या निशाणीवर लढणारा, असेल असा मोठा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला आहे.दरम्यान दोन दिवसांपूर्वीच रत्नागिरी दौऱ्यावर आलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ही सांगितलं की रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा उमेदवार कमळावर असेल. त्यामुळे शिंदे शिवसेना आणि भाजप यामध्ये नेमका हा मतदारसंघांमधील उमेदवार कोण याबाबत प्रतिष्ठेचा प्रश्न बनला असून धनुष्यबाण की कमळ याबाबत आता अनेकांना उत्सुकता आहेwww.konkantoday.com